राजकीय

आश्वासनपूर्तीमुळे ग्रामस्थांकडून आ. पंडित यांचे आभार

Spread the love

यमगरवाडी जोड रस्त्यासाठी 137 लक्ष रुपयांचा निधी मंजूर – आ. विजयसिंह पंडित

 

गेवराई, दि 20 ( वार्ताहार ): प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे यमगरवाडी जोड रस्त्याच्या डांबरी नूतनीकरण कामासाठी 137.29 लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यमगरवाडी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती या माध्यमातून झाली असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. या कामाच्या मंजुरीबाबत त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महायुती सरकारचे जाहीर आभार व्यक्त केले. यमगरवाडी ग्रामस्थांनी आश्वासनपूर्तीबद्दल आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यातील सन 2026-27 मधील महाराष्ट्र राज्यातील कामांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश 18 मे रोजी निर्गमित झाले. यात बीड जिल्ह्यातून केवळ प्रजिमा 20 ते यमगरवाडी या जोड रस्त्याच्या एकमेव कामाचा समावेश आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे यमगरवाडी या जोड रस्त्याचे डांबरीकरण आणि रस्त्यावरील पुलांची कामे करून देण्याचे आश्वासन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. निवडणूक जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण नियोजनपूर्वक काम करत असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले.

ग्रामीण भागात दळणवळणाच्या सक्षम सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने काम सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही गेवराई मतदार संघातील अनेक कामे प्रस्तावित असून त्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

या कामास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महायुती सरकारचे आ. विजयसिंह पंडित यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page