तहसिलदार यांच्यावर होणार कोणत्याही क्षणी कार्यवाई

राक्षसभूवन वाळू उपसा प्रकरणी तहसीलदारांच्या चार कर्मचाऱ्यांसह १९जणांविरुद्ध गुन्हा
तहसिलदार संदिप खोमणे यांचा अहवाल राज्य शासनाकडे जिल्हाधिकारी यांनी पाठवला
गेवराई, दि. १६( वार्ताहार ) – गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात घरकुल धारकांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा झाल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार संदीप खोमणे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येणाऱ्या चार कर्मचाऱ्यांसह अन्य १९ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राक्षसभूवन येथील गोदापात्रात सुमारे २० हजार ब्रास अतिरिक्त वाळू उपसा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यानंतर गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून पुढील निर्णय शासनस्तरावरून होणार आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी यापूर्वीच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन कारवाईचा मार्ग मोकळा केला.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील कारवाई केली जाणार होती. पहिल्या टप्प्यात तलाठी किरण दांडगे, तलाठी गोविंद ढाकणे, कोतवाल शुभम गायकवाड आणि कंत्राटी कर्मचारी विश्वजित शेंबडे यांच्यासह अन्य १९ विरुद्ध नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ईटीपीचे ओटीपी दिलेल्या आणि काही वाहन धारक असे सुमारे १५ खासगी व्यक्तींच्या नावे गुन्हे दाखल केले आहेत. अवैध उपशासाठी वापरण्यात आलेल्या वाहनधारकांवर सुमारे ९० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इतर संबंधितांवरही प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंदणी आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच या कार्यमुळे अवैध वाळू माफिया व महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे.


