क्राईम

वरिष्ठ अधिकाच्या परवानगीने 35 हायवाने वाळू उचलली असल्याची चर्चा

Spread the love

महसूलच्या जप्त वाळूवर माफियांचा डल्ला,सात जणांविरूद्ध गून्हा

 

गेवराई दि. 22 ( वार्ताहर )तालुक्यातील म्हाळज पिंपळगाव परिसरात महसूल प्रशासनाने अंदाजे 500 ब्रास वाळू साठा जप्त केला होता. परंतु तो वाळू साठा दि. 12 जुलै रोजी उचलला असल्याची तक्रार गेवराई पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबत सविस्तर माहिती अशी की, दि. 12 जुलै रोजी म्हाळज पिंपळगाव परिसरातील जप्त वाळू साठा कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्याचा रितसर पंचनामा करून आज दि. 22 जुलै रोजी याबाबत गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच 35 हायवा मार्फत पोलिस प्रशासनाच्या बड्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊन सदरचा वाळू साठा उचलला असल्याची माहिती आहे.या प्रकरणी 1) ईश्वर शिवनाथ सुखदेव, 2) हरी रघूनाथ सुखदेव, 3) संतोष शेषेराव पानखडे, 4) अनिल सुनील उदे, 5) संदीप अशोक डाके, 6) सिद्धेश्वर संभाजी डाके, 7) राजाभाऊ बाबूराव डाके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page