सुकळे गेवराईचे नूतन ठाणेदार

वादग्रस्त कारभारामुळे पोनि पवार यांची उचलबांगडी
गेवराई, दि. 2 (वार्ताहार) गेवराई पोलीस ठाण्याचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त सुरू होता. कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यांमुळे जिल्हाभरात चर्चेत असणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्याची सूत्रे हाती असलेले पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच पोनि बूद्धिराज सुकळे हे आता गेवराई पोलीस ठाण्याची सूत्रे सांभाळणार आहेत.तसेच पोनि किशोर पवार हे आता नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले असल्याची माहिती आहे
गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी गेल्या तीन दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती आणि गेवराई पोलीस ठाण्याचे पितळ उघडे पडले होते. त्याच पार्श्वभूमीवर गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची उचलबांगडी करण्यात आली असून पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी वादग्रस्त पोलीस निरीक्षकांकडून पदभार काढून घेतला आहे. तसेच पोनि बूद्धिराज सुकळे यांची गेवराई पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश बीड पोलीस अधीक्षकांनी काढले असल्याची माहिती आहे.

