गेवराई

पोईतांडा येथे ४६ लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ

Spread the love

एकही तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित

 

गेवराई दि.19 ( वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही. सभामंडप, अंगणवाडी, शाळा, रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळाव्यात यासाठीही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पोईतांडा येथे सुमारे ४६ लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी इमारत व शाळा खोली बांधकाम आणि मजबुतीकरणाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवारावर दाखविलेल्या विश्वासाची आठवण करून देत, प्रचारादरम्यान दिलेला विकासाचा शब्द आता प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्ही.जे.एन.टी. सेलचे अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आसाराम मराठे, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपत नाटकर, माजी सरपंच विष्णू हात्ते, माजी उपसरपंच आक्रम सौदागर, बळीराजा शुगरचे अरुण चाळक, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश महाराज कचरे, इंजिनिअर कल्याण हात्ते, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, माजी सरपंच किरण वावरे, रवि मरकड, अरुण डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी अमरसिंह पंडित यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांनी बंजारा समाजातील महिला व नागरिकांशी संवाद साधून विकासकामे उच्च दर्जाची होतील, यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमास विठ्ठल चव्हाण, सतीश चव्हाण, अशोक चव्हाण, मगन चव्हाण, राहुल पवार, अंकुश पवार, लखन पवार, गणेश जाधव, डी. के. पवार, कैलास चव्हाण, गोपीनाथ चव्हाण, भीमराव चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, पांडुरंग चव्हाण, तुकाराम चव्हाण, शंकर राठोड, विकास राठोड, बन्सी चव्हाण, नंदकिशोर चव्हाण यांच्यासह आनंदवाडी, चाहुरतांडा, पवार मळा, देवितांडा व पोईतांडा येथील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि बंजारा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. जी. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार विष्णू राठोड यांनी मानले.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद बीडचे विस्तार अधिकारी आंबादास चव्हाण यांचा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page