गेवराई

डॉ. निखिल गव्हाणे व स्टाफच्या तत्परतेने नवजात बालकाला जीवदान

Spread the love

रक्षाबंधनच्या दिवशी गाडीच बनली प्रसूती कक्ष;

 

 

गेवराई दि 30 ( वार्ताहार ) : रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी भावा-बहिणीचे नाते जपले जात असतानाच, एका डॉक्टरने माणुसकीचे खरे रक्षण करत नवजात बाळाला जीवदान दिल्याची हृदयस्पर्शी घटना गेवराईत घडली आहे.

शारदा मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरचे  बालरोगतज्ञ डॉ. निखिल गव्हाणे हे रक्षाबंधनच्या दिवशीही आपल्या कर्तव्यावर हजर होते. आणि त्याचवेळी एका गर्भवती महिलेला रूग्णालय परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीत आनले होते तीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. रुग्णालयात पोहोचेपर्यंत

थांबणे धोक्याचे असल्याचे लक्षात येताच डॉ. गव्हाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडीतच प्रसूती करण्याचा धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.या अत्यंत कठीण प्रसंगी डॉ. गव्हाणे एकटे नव्हते, तर त्यांच्या सोबत असलेल्या हॉस्पिटलच्या प्रशिक्षित स्टाफनेही अत्यंत तत्परतेने मदत केली. स्टाफच्या सहकार्याने आणि उपलब्ध साधनांच्या जोरावर डॉ. गव्हाणे यांनी माता आणि बाळ दोघांनाही सुखरूप ठेवत यशस्वी प्रसूती घडवून आणली.

रक्षाबंधनच्या दिवशी जन्माला आलेल्या या बाळाला आणि त्याच्या आईला मिळालेले हे जीवदान म्हणजे खऱ्या अर्थाने रक्षाबंधनच ठरले. सणासुदीला देखील सुट्टी न घेता रुग्णसेवा करणारे डॉ.निखील गव्हाणे आणि त्यांची टीम यांच्या या कार्याचे गेवराई परिसरातून कौतुक होत असून, वैद्यकीय क्षेत्रात माणुसकी अजूनही जिवंत असल्याची प्रचिती या घटनेने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page