जगदंबा शिक्षण मंडळाकडून कौतूकाची थाप

गेवराई तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जयभवानी विद्यालय गढीचा डंका
गेवराई दि 25( वार्ताहार ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर गढीच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी संघात सक्षम आजबे, सार्थक मावसकर, समर्थ चौधरी, पवन पवार, विराट चौधरी, अभिषेक वराबडे, समर्थ तळतकर, प्रिन्स चव्हाण, ऋषिकेश शेळके, पृथ्वीराज अजबे, यश खैरे, मोहन धुमाळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक गणेश यादव, डोंगरे सर, आकाश आडे, दीपक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पंडित, अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित, उपमुख्याध्यापक प्रा. गणेश पवळ, उपप्राचार्य कल्याण जायगुडे, पर्यवेक्षक रणजित बडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


