क्राईम

स्थानिक गून्हे शाखेची कामगिरी

Spread the love

बजरंग बलीच्या मूर्तीची विटंबना करणारा गजाआड

 

गेवराई दि. १२ (वार्ताहर) – चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील ब्रह्मगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने बजरंग बलीच्या मूर्तीवर मांस टाकून विटंबना करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रह्मगाव येथील पुरातन बजरंग बली मंदिरातील मूर्तीवर अज्ञात व्यक्तीने मांस टाकल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या आणि गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने लवकरच आरोपीला अटक करू, असे आश्वासन दिले होते.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पथकाने रात्री पेंडगाव परिसरात सापळा रचून आरोपी नासेरखा बालेखा पठाण (वय ५५) याला ताब्यात घेतले. आरोपी अहमदनगर, बीडसह इतर भागांत वेगवेगळ्या मार्गाने फिरत होता.

बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर, गोविंद राख, अर्जून यादव, विकास राठोड, अंकुश वरपे, इनूस बागवान, अलिम शेख आणि चालक नितीन वडमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page