बीड

बीडला मिळाले नूतन अप्पर अधीक्षक

Spread the love

समीर शेख बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक

 

बीड: दि 21( वार्ताहार )  तब्बल साडेतीन वर्ष बीडला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर सचिन पांडकर यांची धाराशिवला बदली झाली होती. अखेर आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागी राज्य नियंत्रण कक्षातून समीर शेख यांची नियुक्ती झाली आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या साडेतीन वर्षात सचिन पांडकर यांनी पोलीस दलात केलेले कार्य जिल्हावासियांच्या स्मरणात राहणारे ठरणार आहे. बीडची जाळपोळ, जातीय तणाव, संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या अनेक गंभीर प्रकरणात त्यांनी ठोस भूमिका घेऊन कायद्याचा ‘धाक’ कायम ठेवण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता. पोलीस दलातील आश्वासक चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात होते.

बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पांडकर यांच्या रूपाने साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या बदलीनंतर बीडला कोणाची वर्णी लागते याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असताना समीर शेख हे बीडला येत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button

You cannot copy content of this page