विमानतळ, रेशीम उद्योगासह रेल्वे, अनेक प्रकल्प गेवराईतूनच

बीड जिल्ह्यात ‘पंडित बंधूंचा विकासाचा अमर पॅटर्न’
गेवराई, दि. 17 (वार्ताहार):गेवराई मतदारसंघात ‘पंडित पॅटर्न’च्या विकासाचा अश्व वेगाने धावू लागला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यात गेवराईच्या विकासाची चर्चा सुरू झाली आहे. अनेक मंत्री असणारे तसेच दहा वर्षे विधानसभेची सत्ता भोगणारे आता मागे पडू लागले आहेत.
शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणारे प्रकल्प मंजूर झाल्याने अनेकांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे. गेवराई मतदारसंघात अल्पावधीच्या कार्यकाळातच मा. आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांचा विकासाचा झंझावात सुरू आहे.आ. विजयसिंह पंडित हे विजयी झाल्यापासून गेवराई मतदारसंघात शोषित-पीडित समूहासह समाजोपयोगी कामे जोरात सुरू आहेत. मतदारसंघात समाजमंदिरे, रस्ते, नाली, सभामंडप, गेवराई शहरातील संघमित्र नगर येथील बौद्ध विहार अशी कामे प्रगतीपथावर आहेत.
एवढेच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून शहरात प्रलंबित असलेल्या विंद्रूपा नदीला पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने संरक्षण भिंत बांधणे यासह अनेक विकासकामांचा धडाका गेवराई मतदारसंघात सुरू आहे. बीडला येणारी रेल्वे देखील गेवराईतूनच जाणार आहे.मा. आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


