‘ये तो झाँकी है, पिक्चर अभी बाकी है’

पंडित बंधूंच्या पुढाकारातून गेवराई मतदारसंघाचा विकास पाहून अनेकांची झाली गंमत
गेवराई, दि. 18 (वार्ताहार): गेवराई मतदारसंघाचे नेतृत्व आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे आल्यापासून मतदारसंघाला खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली आहे. मा. आ. अमरसिंह पंडित यांचे विकासाचे मार्गदर्शन पाहता अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. काही काळ मंत्री असणाऱ्यांना जे जमले नाही ते दीड वर्षात पंडित बंधूंनी करून दाखवले आहे, यामुळे अनेकांची गंमत झाली आहे.
गेवराई मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून विकासाला गती नव्हती.अनेकांनी मतदारसंघात उद्योग-प्रकल्पांचे गाजर दाखवून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. दीड वर्षांपूर्वी या मतदारसंघाला बोलका आमदार विजयसिंह पंडित यांच्या रूपाने मिळाला. यापूर्वीचे राज्यकर्ते मुंबईला गेल्यानंतर आपल्या रुमचा दरवाजा बाहेरून लॉक लावून बसायचे, कार्यकर्त्यांनाही भेटायचे नाहीत, याची गंमत कधी वाटली नाही का?
गेल्या दीड वर्षापासून पंडित बंधूंनी गेवराई मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मा. आ. अमरसिंह पंडित सतत कार्यरत असतात. व्यापारी संकुल, विंद्रूपा नदी संरक्षण भिंत, बौद्ध विहार, रेणुका मंदिर बांधकाम, अतिसंवेदनशील गावातील स्मशानभूमीचे वाद या सर्व प्रश्नांवर पंडित बंधूंच्या पुढाकारातून प्रशासन दरबारी तोडगा निघाला आहे.
सन 2016 चा पीक विमा देखील गेवराई मतदारसंघातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांच्या स्वरूपात मिळाल्यामुळे येथील शेतकरी सधन होण्याच्या मार्गावर आहे. आता रेशीम उद्योग, एमआयडीसी, रेल्वेसह अनेक प्रकल्प या मतदारसंघात होणार असल्याने विकासाला खोडा घालण्याची गंमत कोणी करू नये म्हणजे झाले. ‘ये तो सिर्फ झाँकी है, पिक्चर अभी बाकी है’.



