क्राईम

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Spread the love

तहसीलदार संदीप खोमणे यांना न्यायालयाचा दणका

 

गेवराई, दि. 3 (वार्ताहर) राक्षसभुवन घरकुल वाळू घोटाळ्यातील संशयित असणाऱ्या तहसीलदार संदीप खोमणे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यात त्यांचा जामीन अर्ज बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असल्याने वादग्रस्त तहसीलदार संदीप खोमणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन घरकुल घोटाळ्यातील संशयित असणारे तहसीलदार संदीप खोमणे हे सक्तीच्या रजेवर असताना त्यांच्याविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावातील व्हॉटसअप ग्रुपवर जातिवाचक चॅटिंग केल्याच्या प्रकारामुळे न्यायालयाच्या आदेशान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ते या गुन्ह्यात अद्याप फरार असून त्यांनी बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तसेच राक्षसभुवन घरकुल वाळू घोटाळ्यात देखील त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page