जयभवानी विद्यालयाचा निकाल ९८.५० टक्के

कु. सावंत श्रुती, कु. दातखीळ साक्षी, कु. ढाकणे दिव्या, कु. आटपळे भक्ती आणि चि. मोरे वरद यांचे घवघवीत यश
गेवराई, दि. ८ ( वार्ताहार ): नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत जयभवानी विद्यालयाचा निकाल ९८.५० टक्के लागला असून, या निकालात जयभवानीच्या मुलीच अव्वल ठरल्या आहेत. जयभवानी विद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी जयभवानी विद्यालयाचे एकूण २६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत ३८ व द्वितीय श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सावंत श्रुती अनिल हिने ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. दातखीळ साक्षी शिवाजी आणि चि. मोरे वरद मनोज या विद्यार्थ्यांनी ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. कु. ढाकणे दिव्या बाबासाहेब आणि कु. आटपळे भक्ती दत्तात्रय यांनी ९३.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव पंडित, संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, आमदार विजयसिंह पंडित, शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित, प्रशासकीय अधिकारी काशिनाथ गोगुले, प्राचार्य व्ही. पी. राठोड, पर्यवेक्षक रणजीत बडे, ज्येष्ठ शिक्षक सुदाम शेजाळ, गणपत डोंगरे, दिपक शिंदे, चंद्रकांत पवार, सुमेर सय्यद, शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र गर्कळ, अनिकेत कांडेकर, ऋषिकेश फुलझळके यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.