गेवराई

Spread the love

गेवराई वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.एल.ई.लगड, तर सचिवपदी ॲड.अरविंद बांगर यांची निवड

 

गेवराई दि ३ ( वार्ताहार ): गेवराई वकील संघाची निवडणूक प्रक्रिया आज (दि. ३ जून) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली, तर दुपारी ३.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी करण्यात आली. सन २०२६ च्या गेवराई वकील संघाच्या निवडणुकीत एकूण १७० सदस्यांपैकी १५७ सदस्यांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीच्या निकालानुसार अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एल. ई. लगड, उपाध्यक्षपदी ॲड. पांडुरंग जरांगे, सचिवपदी ॲड. अरविंद बांगर आणि कोषाध्यक्षपदी ॲड. सतीश कुलकर्णी यांची निवड झाली. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. आर. आर. रुचके यांनी काम पाहिले, तर सहाय्यक म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. डी. सानप यांनी जबाबदारी पार पाडली.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, विजयी उमेदवारांनी सर्व विधिज्ञ मतदारांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page