क्राईम

गेवराई न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

Spread the love

मारहाण करून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी

 

गेवराई, दि. 7 (वार्ताहार): महिलेला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गेवराई येथील प्रथमवर्ग न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी शामसुंदर गणाजी शिंदे, वय 34, रा. लूखमसला, ता. गेवराई यास न्यायालयाने दोषी ठरवत 3 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर. ए. मिसाळ यांनी गेवराई पोलीस ठाणे गु.र.नं. 311/2016, भा.दं.वि. कलम 325, 323, 504, 506, 509, 34 अन्वये दाखल गुन्ह्याचा निकाल जाहीर केला. न्यायालयाने आरोपीस कलम 325 व 509, 34 भा.दं.वि. खाली दोषी धरले.

फिर्यादी सुमन सुंदर पवार, रा. लूखमसला यांना आरोपी शामसुंदर शिंदे याने शिवीगाळ करून, धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत फिर्यादीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. या प्रकरणी सुमन पवार यांनी 2016 मध्ये गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अहवाल व सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीने गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळे न्यायमूर्ती मिसाळ यांनी आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात 8 वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय मिळाल्याने लूखमसला व परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कटके, उपविभाग गेवराई यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सध्या मा. न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या जुन्या व प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, गेवराई हे न्यायप्रविष्ट खटल्यांचा नियमित पाठपुरावा करत आहेत. साक्षीदार हजर करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे. त्याच परिणाम म्हणून जुने खटले निकाली निघत आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासी अंमलदार पोहेकॉ एस. व्ही. घाणे, ब.नं. 615, पोलीस ठाणे गेवराई यांनी केला होता. न्यायालयात शासकीय अभियोक्ता म्हणून ॲड. एस. के. माने यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ व्ही. डी. म्हेत्रे, ब.नं. 343 व पोकॉ डी. आर. ढाकणे, ब.नं. 392 यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page