क्राईम

अवैध वाळू प्रकरणात तरुणाचा बळी;

Spread the love

पोलीस-महसूलच्या आशीर्वादाने ‘मृत्यूचा खेळ’ सुरू

 

गेवराई, दि. 12 (वार्ताहर): सावळेश्वर गोदापात्रात अवैध वाळू उपसा जीवघेणा ठरला आहे. हायवात वाळू भरत असताना लोडरच्या खोऱ्यातील दगड डोक्यात पडून सचिन पुरी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, कालच महसूल पथकाने लाच घेऊन हायवा सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आज याच ठिकाणी एकाचा बळी गेला.

सावळेश्वर परिसरात अवैध वाळू उपशाच्या अनेक तक्रारी यापूर्वीही झाल्या. मात्र, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने हा उपसा बिनधास्त सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काल दि. 11 रोजी महसूल पथकाने प्रत्येक हायवाकडून 7 हजार रुपये घेऊन वाहने सोडल्याची रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. “वाळू जंगलात वाळू माफियाच किंग आहेत” असे त्या व्हिडिओत म्हटले होते.

प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आज सचिन पुरीचा जीव वाचला असता, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

सावळेश्वर गोदापात्रात रात्रीच्या सुमारास हायवात वाळू भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी लोडरच्या खोऱ्यातून अचानक मोठा दगड निसटून सचिन पुरी यांच्या डोक्यावर आदळला.गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page