गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू

गेवराई शहरात दोन गटात तलवारीने तुफान हाणामारी; पाच गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
गेवराई, दि. १० (वार्ताहर) गेवराई शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन गटातील युवकांमध्ये तलवारीने तुफान हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर गेवराई शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या कुंभार गल्ली परिसरात मंगळवारी रात्री फटाके वाजविण्याच्या काराणावरून दोन गटात अचानक वाद झाला. या वादाचे रुपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. यावेळी एका गटाने तलवारीने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात पाच जणांना पाठीत, मानेवर आणि छातीवर गंभीर वार लागले.यामध्ये सार्थक सुनिल खडके – पाठीत वार ,ओम गणेश खडके – मानेवर वार सुनिल सुधाकर खडके – छातीवर वार,गणेश गोरे – पाठीवर वार ,ओम गायकवाड – मानेवर वार असे गंभीर दूखाा:पत झाली आहे
जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर बीड आणि छ.संभाजी नगर येथे उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अक्षय राऊत,जनार्धन राऊत,ओम राऊत,राहुल शेलार, मिरा राऊत (सर्व रा. गेवराई) यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया गेवराई पोलिस ठाण्यात सुरू आहे
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
या घटनेमुळे गेवराई शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वादाचे कारण फटाके वाजविण्याच्या कारणावरूण झाले असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत गेवराई पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



