क्राईम

पोलीस तात्काळ घटनास्थळावर

Spread the love

गेवराई शहरात दोन गटात तुफान हाणामारी; दोन गंभीर, एकाची प्रकृती चिंताजनक

 

गेवराई, दि. १० (वार्ताहर)  शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन गटातील युवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर हजर झाले.

शहराच्या मध्यभागी दोन गटात अचानक तलवारीने वाद झाला. यामध्ये तीन जण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर गेवराई शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेमुळे गेवराई शहरात खळबळ उडाली असून, वादाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत गेवराई पोलीस तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page