सामाजिक

नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दूष्काळग्रस्त जनता जाण ठेवील

Spread the love

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे समाजसेवा क्षेत्राची मोठी हानी – अमरसिंह पंडित

 

गेवराई, दि. ८ (वार्ताहार)  प्रतिभावंत अभिनेते आणि संवेदनशील समाजसेवक नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारे आहे.

अभिनय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ज्या अभिनेत्याला सर्वसामान्य जनता आपला ‘हिरो’ मानते, अशा मोजक्या कलाकारांपैकी सामान्य जनतेप्रती आपले उत्तरदायित्व मानणारे एक ‘रिअल हिरो’ म्हणून नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासले.

गेवराई तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत नदी, नाले आणि ओढ्यांचे खोलीकरण, सरळीकरण व रुंदीकरण, तसेच तलाव आणि बंधाऱ्यांतील गाळ काढून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी नाम फाउंडेशन आणि शारदा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे काम केले.

गेवराईसारख्या सततच्या अवर्षणप्रवण दुष्काळग्रस्त भागात नाम फाउंडेशनने केलेली मदत येथील जनता कधीही विसरणार नाही. सामाजिक जाणीव आणि दूरदृष्टी असलेला हा समाजसेवक अकाली निघून गेल्याने समाजसेवा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा ‘दुष्काळ पडल्याची भावना’ निर्माण झाली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page