गेवराई

दिव्यांग लाभार्थ्यांना आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते मंजुरीपत्राचे वाटप

Spread the love

दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील – आ. विजयसिंह पंडित

 

गेवराई, दि. २४ ( वार्ताहार ) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत सुलभपणे पोहोचावा, त्यांना प्रशासकीय पातळीवर अडचणी येऊ नयेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. दिव्यांग बांधवांकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहण्याऐवजी त्यांच्या क्षमता, कौशल्य आणि आत्मविश्वासाला योग्य संधी मिळणे गरजेचे आहे. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. त्यांच्या शुभहस्ते गेवराईमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष रविंद्र बोराडे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी सातत्याने गेवराई विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. सामाजिक सेवाभाव वृत्तीने त्यांनी दरवर्षी मोफत कृत्रिम अवयव बसविण्याच्या शिबिराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते गेवराईत २६८ दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. आजवर १७०२ लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ देण्यात आला आहे.

यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष रविंद्र बोराडे, सदस्य अजीम इनामदार, परमेश्वर खरात, गजानन काळे, सतीश गाडे, दादासाहेब रोकडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी उपनगराध्यक्ष विनोद सौंदरमल यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमातून आजवर १७०२ लाभार्थ्यांना सुलभपणे लाभ देण्यात यश आले आहे. दिव्यांगत्व ही व्यक्तिमत्वाची ओळख नसून त्यांच्यातील क्षमता, जिद्द आणि आत्मविश्वास हीच खरी ओळख आहे. समाजात सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांग बांधवांना सहकार्य करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे. यासाठी त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहण्याऐवजी त्यांच्या क्षमता, कौशल्य आणि आत्मविश्वासाला संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिव्यांग बांधवांच्या अनुदानात वाढ व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला सोमनाथ पुरणे, दत्ता दाभाडे, मनोज हजारे, जालिंदर पिसाळ, अक्षय पवार, शांतीलाल पिसाळ, वसीम फारुकी, दिपक निकाळजे, देविदास खरात, संदीप मडके, हनुमान कोकणे, बंटी सौंदरमल, विलास सुतार, शेख सुभान, महादेव बेदरे, शेख महाजत, शेख हसन, तिर्थराज कदम, बाबासाहेब घोडके, राजू हंडे, भागवत काकडे, लहू लोखंडे, रवि पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page