क्राईम

गुटखा, दारू आणि वाळूवर चकलांबा पोलिसांचे धाडसत्र

Spread the love

लाखोंचा मुद्देमाल जप्त, गुटखा प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

 

गेवराई दि. 22 ( वार्ताहर ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे चर्चेत आले होते. परंतु आज दि. 22 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चकलांबा पोलिसांनी वाळूची एक हायवा, गुटखा आणि अवैध दारू यावर धाडसत्र टाकले. यामध्ये लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून यामागील प्रमुखांवर कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चकलांबा ठाणे हद्दीतील उमापूर येथील नाझेम सौदागर हा गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या खाजगी मोटारसायकलवरून गुटख्याची तस्करी करीत होता. याची कुणकुण चकलांबा पोलिसांना लागली होती.चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रमुख सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कराडकर यांनी ही कारवाई केली आहे. गुटखा प्रकरणी गेवराई आणि शहागड कनेक्शन उघड होण्याची शक्यता असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page