गेवराई मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास कामे करण्यासाठी कटीबद्ध – मा.आ अमरसिंह पंडित

रामनगर तांड्यावर शाळा व अंगणवाडीच्या नव्या इमारतींचे अमरसिंह पंडित यांच्या हस्ते लोकार्पण
अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कुंभेजळगाव अंतर्गत येणाऱ्या रामनगर तांडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शाळेच्या वर्गखोली व अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अमरसिंह पंडित यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. नव्या शाळा वर्गखोली व अंगणवाडी इमारतीमुळे रामनगर तांड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, लहान बालकांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास गेवराई खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जयदीप औटी, माजी पंचायत समिती सदस्य हिंमतराव खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, गटशिक्षणाधिकारी नांदूरकर, रवी पवार, शंकर पवार, बाबुराव जाधव, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष गणपत राठोड, लक्ष्मण लेंडगुळे, सरपंच कुंडलिक चव्हाण, पिकाजी राठोड, बंडू राठोड, सुरेश चव्हाण, अंबादास राठोड, पोपट चव्हाण, धनु राठोड यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामनगर तांड्याच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा असून, शिक्षणासोबतच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अशा विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


