क्राईम

चकलांबा पोलीसांकडून वाळूच्या ट्रॅक्टर जप्त

Spread the love

सपोनि राजेश गडवे यांची कार्यवाई; एकावर गुन्हा दाखल

 

गेवराई, दि. 7 (वार्ताहार): अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात चकलांबा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे राक्षसभुवन फाट्याजवळ सापळा रचून वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईत 8 लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे चकलांबा येथे नेमणुकीस असलेले पोहेकॉ प्रशांत कल्याण घोंगडे, वय 31, यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. दिनांक 07/05/2026 रोजी सायंकाळी 4.40 वाजण्याच्या सुमारास सपोनि गडवे, पोउपनि अनंता तांगडे यांच्यासह पोहेकॉ घोंगडे हे उमापूर हद्दीत खाजगी वाहनाने अवैध वाळू उपसा व चोरट्या वाहतुकीवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी पोउपनि तांगडे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गोदावरी नदीपात्रातून एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू भरून राक्षसभुवन फाट्याकडे जात आहे. माहिती मिळताच दोन पंचांना बोलावून त्यांना घटनेची माहिती दिली. सायंकाळी 5.00 वाजता पोलीस पथक राक्षसभुवन फाट्याजवळ पोहोचले.

त्याचवेळी राक्षसभुवन गावाकडून राक्षसभुवन फाट्याकडे वाळूने भरलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी राक्षसभुवन कमानीजवळ ट्रॅक्टर थांबवून चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने बाबासाहेब आश्रुबा जोगदंड, वय 30 वर्षे, रा. राक्षसभुवन, ता. गेवराई, जि. बीड असे सांगितले.

ट्रॉलीतील वाळूच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केली असता खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला

8,53,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बाबासाहेब जोगदंड याच्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page