क्राईम

पुण्यात पिस्तूलबाजांची हवा टाईट

Spread the love

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका, दोन वर्षांत 289 परवाने रद्द

 

पुणे, दि. 30 (वार्ताहार): पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत मंगळवारी एकाच दिवसात 40 शस्त्र परवाने रद्द केले. नूतनीकरण न करणे व शस्त्राची गरज नसल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर शस्त्र परवाना प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी 289 परवाने रद्द केले असून, 476 नवीन अर्ज फेटाळले आहेत.

स्वसंरक्षणाचे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवाने मिळवले होते. काही महिन्यांपूर्वी यावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत अनेकांना कोणत्याही प्रकारची धमकी नसल्याचे उघड झाले. काहींनी समाजात दबदबा निर्माण करण्यासाठी परवाने घेतल्याचेही समोर आले.

एकही नवा परवाना मंजूर नाही
आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात खेळाडू वगळता एकही नवीन शस्त्र परवाना मंजूर केलेला नाही. अर्ज मंजूर होणार नाही याची जाणीव झाल्याने नवीन अर्ज येण्याचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे.

काटेकोर पडताळणी प्रक्रिया”शस्त्र बाळगण्याची आवश्यकता काय आहे, याबाबत सखोल तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, अशा प्रत्येक परवानाधारकाची काटेकोर पडताळणी करूनच पुढील निर्णय घेतला जात आहे,” असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page