शितल धोंडरे यांना एका दिवसात जामीन मंजूर

राज्यात गाजलेल्या ओटीपी घरकुल वाळु चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची जामिनवर सुटका
गेवराई दि 24 (वार्ताहार) राज्यात चर्चेत आलेल्या ओटीपी घरकुल वाळू प्रकरणातील आरोपी शितल शिवाजी धोंडरे यांना गेवराई न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. घरकुल लाभार्थ्यांकडून ओटीपी घेऊन गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.चकलंबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १९९/२०२६ मध्ये आरोपी शितल शिवाजी धोंडरे यांना पोलिसांनी दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी अटक केली होती.
त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.दरम्यान, आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी गेवराई न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. मोमीन साहेब यांनी आरोपी शितल धोंडरे यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे अवघ्या एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहेया प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. के. एस. वैद्य, ॲड. आबा ढाकणे, ॲड. सतीश शेंबडे व ॲड. शेख हारुण , सोनवणे रंणजित यांनी काम पाहिले.



