गेवराई

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन

Spread the love

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

गेवराई, दि.३१ ( वार्ताहार ) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट या रुग्णालयाचे शुक्रवार, दि.३१ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेवराई शहरात सुरु होणाऱ्या सुसज्ज रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव जयसिंग पंडित यांनी केले आहे.

जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट या १०० खाटांच्या रुग्णालयाचा शुभारंभ होत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दि.३१ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आमदार भिमराव धोंडे, बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे प्रा. सुनिल मगरे, राष्ट्रवादी भटके विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड, बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, स्वप्निल गलधर, सचिन मुळूक, चंद्रकांत नवले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयसिंग पंडित यांनी केले आहे.

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट या १०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयु, व्हेंटिलेटर सुविधेसह बालरोग विभाग, मेडिसिन विभाग, प्रसुती व स्त्रीरोग विभाग, दंत विभाग, शस्त्रक्रिया विभाग रुग्णालयात कार्यरत असणार आहेत. अत्याधुनिक आरोग्य सुविधा रुग्णालयात मिळणार असून विविध तपासण्या व निदान पध्दतीची सोय येथे करण्यात आली आहे. अत्याधुनिक सर्व सुविधा एका छत्राखाली उपलब्ध असणार आहेत. गेवराई शहरात उभारण्यात येणाऱ्या या सुसज्ज रुग्णालयामुळे रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे. रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित यांनी केले आहे. सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याचे भुमिपूजन शुक्रवार, दि.३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. १८.१५ कोटी रुपये किंमतीच्या बॅरेज बांधकामामुळे परिसरातील सुमारे १५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या बॅरेजमध्ये ०.७२ दशलक्ष घनमीटर शाश्वत पाणीसाठा निर्माण होणार आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. सिंदफणा नदीकाठी या बॅरेजच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page