राजकीय

78 वर्षांनंतर पहिल्यांदाच उमापूरच्या हिंगे वस्तीला रस्ता पोहोचला

Spread the love

मा.आ.अमरसिंह पंडीत,आ. विजयसिंह पंडीत यांनी विधानसभेला दिलेला शब्द पाळला

 

गेवराई, दि. 18 (प्रतिनिधी): उमापूर ग्रामपंचायत हद्दीतील हिंगेवस्तीत स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर रस्ता पोहोचला आहे. रस्त्याअभावी येथे वाहन पोहोचणे जिकिरीचे होते. त्यामुळे गरोदर महिला, ज्येष्ठांचे अधिक हाल होत असत. त्यामुळे येथे दळणवळणाची सोय द्यावी, अशी 35-40 वर्षांपासून मागणी होती. परंतु त्यानंतरही रस्त्याचे काम होत नव्हते.

विधानसभा निवडणुकीत मा. आ. अमरसिंह पंडीत आणि आ. विजयसिंह पंडीत यांच्याकडून खरेदी-विक्री संघाचे सभापती जयदिप औटी यांनी या वस्तीवरील नागरिकांना शब्द मिळवून दिला होता. वचनपूर्ती करत मा. आ. अमरसिंह पंडीत आणि आ. विजयसिंह पंडीत यांनी उमापूर फाटा ते हिंगे वस्तीचा दर्जेदार रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष कामास काल सुरुवात झाली आहे.

गत अनेक वर्षांपासून उमापूर ते पंचाळेश्वर ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजना अंतर्गत सदर काम होणार आहे. एकूण सहा किमीचा रस्ता मजबुतीकरण होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

काल माजी आ. अमरसिंह पंडीत यांच्या उपस्थितीत हिंगे वस्ती येथील सुभाष हिंगे, शिवाजी जाधव, नवनाथ बांडे, सर्जेराव हिंगे, प्रशांत जाधव, मदन बांडे, राजेंद्र जाधव, उद्धव बांडे, सुरेश हिंगे, राधाकिसन बांडे, विजय जाधव, बाबासाहेब हिंगे, योगेश कोल्हे, बाळकृष्ण देशमुख यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page