१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर गेवराई पोलिसांची कारवाई
गेवराई, दि. 30 (वार्ताहार): गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळजपिंपळगाव शिवारात जेसीबीच्या साह्याने वाळूची चोरी करणारे दोन ट्रॅक्टर केनीसह पोलिसांनी छापा मारून पकडले. या कारवाईत एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार अवैध वाळू तस्करीवर कठोर कारवाई करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत म्हाळजपिंपळगाव शिवारात जेसीबीच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती बातमी दारामार्फत गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांनी छापा मारून वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर केनीसह ताब्यात घेतले. १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कडके, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरेश पारधी, पोकॉ कल्याण राठोड, नितीन शिंदे, गोरक्ष डोके, धिरज खांडेकर, ऋषी पोटे यांनी केली.



