क्राईम

अवैध वाळू तस्करी फोफावली, अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून वाहने पळवली

Spread the love

गेवराईत तीन तर चकलांबा पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल

गेवराई, दि. 28 (वार्ताहार):गेवराई तालुक्यात अवैध वाळू तस्करीने उच्छाद मांडला आहे.वाळू माफिया आता थेटअधिकारी-कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून वाहने पळवू लागले आहेत.ही बाब अत्यंत खेदजनक असून, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या सूचनांकडे ठाणेदार कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. चकलांबा पोलिसांनी तर बीड पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे.

महसूल पथकाला हुलकावणी देऊन दोन ट्रॅक्टर पळवल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध, तर चकलांबा पोलीस ठाण्यात जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करणाऱ्या एकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणगाव परिसरात महसूल पथकाला हुलकावणी देऊन वाळूने भरलेली दोन वाहने पळवण्यात आली. तर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगाव परिसरात चक्क जेसीबीच्या साह्याने वाळू भरली जात होती.तसेच चकलांबा पोलिसांच्या ताब्यातून एक टेम्पो पळवण्यात आल्याची नोंद फिर्यादीत आहे. तो टेम्पो मुद्दाम पळवला असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.

चकलांबा पोलीस ठाणे वाळू माफियांचे केंद्र बनले असून,काल रात्री देखील राक्षसभुवन परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूने भरलेले अनधिकृत हायवा जात असल्याची माहिती आहे.चकलांबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन इंगळे यांचा कारभार वादग्रस्त ठरत आहे.

या कारवाईत एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page