गेवराई दि ९ ( वार्ताहार ) प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी गेवराईत भिमज्योती जन्मोत्सव मोठ्या आंनदात साजरा केला जातो याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाणे हा उत्सव दि ७ एप्रिल पासून गेवराईत साजरा करण्यास सुरूवात झाली आहे तसेच धम्मदेसना ही पु भंदत बूद्धरत्न ( नंदूरबार ) यांचे हस्ते पार पडली तसेच सायं सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा भिमगिताचा कार्यक्रम पार पडला तसेच दि ८ रोजी प्रा श्याम मुंडे यांचे महात्मा जोतिराव फूले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मानव मुक्तीचा विचार यासह ईत्यादी कार्यक्रम पार पडले आहेत.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात जगात साजरी केली जाते तसेच यावेळी गेवराई येथील भिमजोती जन्मोस्तव २०२६ हा गेवराई विधान सभा मतदार संघाचे आ विजयसिंह पंडित हे या सार्वजानिक जंयती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत तसेच आज दि १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर व साय विधिज्ञ महेश मुठाळ यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना,हे सामाजिक कार्यक्रम पार पडले असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विधिज्ञ भगवान घूबांर्डे,माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे,विधिज्ञ अभिजीत जैस्वाल,पत्रकार संघाचे अध्यक्ष मधूकर तौर,वैद्यकीय अधीक्षक सुरज कोठावळे,नगर सेवक शारूख पठाण,विजय सुतार,योगेश मोटे,रणविर पंडित,हे उपस्थित होते.
तसेच दि १० एप्रिल रोजी व्याखाते प्रा यशवंत गोसावी यांचे फूले शाहू आंबेडकर भारताचा श्वास आहेत हे व्याख्यान व दि ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फूले यांच्या जंयतीनिमित्त अभिवादन सभा व साय ७ वा रायझिंग स्ट्रार डान्स एकॅडमी पुणे प्रस्तूत भिमजल्लोष भीम गितांचा कार्यक्रम निर्मार्ते अनिकेत अविनाश गायकवाड,तसेच १२ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व संगितकार,राहूल साठे यांचा भीमगितांचा कार्यक्रम शास्त्री चौक याठिकाणी होणार आहे या सर्व कार्यक्रमाला बाळासाहेब सानप,सोपान मडके,जग्गनाथ काळे,डॉ विठ्ठल काळे,सय्यद बद्दोदीन ,मा दादासाहेब घोडके,धनंजय बेदरे,मुकेश महाजन,तसेच १२ एप्रिल रोजी भीमज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आ विजयसिंह पंडित,कल्याणराव आखाडे,बीड नगरध्यक्षा प्रेमलताताई पारवे व उप विभागिय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्या उपस्थितीथ पार पडणार आहे तरी या भीमज्योती जन्मोत्सव कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन भीमज्योती जन्मोत्सव समितीचे रविंद्र बोराडे,नगर सेवक खाजा मामू,गजानन काळे,मायकल सुतार,सय्यद ऐजाज,बप्पा बेदरे,नगर सेवक शेख शहेदाद,रंजित घूबांर्डे,शेख निजामभाई,देवा जोशी,बाबा पिसाळ,दादासाहेब चौधरी,रिपाइं तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर,बंन्टी सौंदरमल,धम्मपाल भोले,धम्मपाल सौंदरमल आदिंनी केले आहे.