क्राईम

अवैध धंद्यावर पो.नि. बुद्धिराज सुकाळे यांचे धाडसत्र सुरूच

Spread the love

हॉटेल चावार्क परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा

 

गेवराई, दि. २० (वार्ताहर) :गेल्या काही दिवसांपूर्वीच गेवराई पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील फोफावलेले अवैध धंदे यांना मोठ्या प्रमाणावर दणका मिळत आहे. अवैध वाळू तस्करीसाठी चर्चेत असणारे गेवराई पोलीस ठाणे हे आता वाळू तस्करी व अवैध धंदेवाल्यांचे कर्दनकाळ बनले आहे. तसेच गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हॉटेल चावार्क परिसरात जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने पो.नि. बुद्धिराज सुकाळे यांच्या नावाची दहशत आता अवैध धंदेवाल्यांना बसली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गेवराई पोलीस ठाणे हे वादाच्या भोवऱ्यात होते. त्याठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पो.नि. बुद्धिराज सुकाळे यांच्याकडे पदभार दिला. अवघ्या काही दिवसातच त्यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कर्तव्यकठोर असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. वाढत्या गुन्हेगारीतील गुन्हेगार अथवा रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. वाळूच्या गाड्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत.

तसेच गेवराई शहरापासून काही अंतरावर हॉटेल चावार्क परिसरात काल रात्री गेवराई पोलिसांनी सुरू असलेल्या जुगार अड्यावर मोठी कारवाई केली. अनेक जुगारींना अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पो.नि. बुद्धिराज सुकाळे यांनी दिली असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन न करणाऱ्या इसमावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच या कार्यवाईत ७ लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जूगार प्रकरणी यांच्या विरूद्ध गून्हा दाखल

1 )संतोष दादासाहेब बारगजे, 2) संतोष आप्पासाहेब नेवाळे, 3) शेख गफार अब्दूल रेहमान, 4) कदीर निजामुद्दीन शेख, 5) अर्जून गिताराम धुतडमल, 6) भरत श्रीरंग इंगोले 7 ) सुभाष गोपीनाथ भावले, 8) जानेश्र्वर आसाराम वादे, 9) संजय निवृत्ती सुतार, 10) मजहर आब्दीन शेख, सर्व रा.गेवराई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page