क्राईम

पोलिस निरीक्षक बूद्धिराज सुकाळे यांची माहिती

Spread the love

तलवार हल्ला प्रकरणी एक मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक

 

गेवराई, दि. ११ (वार्ताहर) गेवराई शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन गटात तलवारीने झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणी गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार अक्षय राऊत, राहुल शेलार तसेच एका महिलेचा समावेश आहे. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.व अन्य दोन आरोपी फरार आहेत दरम्यान, या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच घटनेचं गांभिर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक समिर शेख यांनी घटनास्तळाची पाहणी केली

या घटनेनंतर गेवराई शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा शोध घेतला. अखेर तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page