गेवराई

परिसरात मोठी खळबळ

Spread the love

संजय नगरमध्ये गॅसचा स्फोट; तिघे गंभीर

 

गेवराई, दि. 7 (वार्ताहार) शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेले बंजारा क्रांती दलाचे नेते लक्ष्मण चव्हाण यांच्या राहत्या घरी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांची पत्नी, बहीण आणि भाचा हे गंभीररित्या जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

संजय नगर या गजबलेल्या वस्तीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे स्वर्णा लक्ष्मण चव्हाण, जनाबाई राठोड आणि अमोल राठोड अशी असून, यामध्ये दोन महिला गंभीर असल्याने त्यांच्यावर गेवराई येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छ. संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक शाहरुख पठाण व भाजपाचे नेते शिवराज पवार यांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिसरात आणखी जीवितहानी होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने सदरची आग विझवली.ऐन दिवाळीच्या सणादरम्यान ही घटना घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तसेच यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button

You cannot copy content of this page