क्राईम

वाळूसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

राक्षसभूवन घोटाळ्यातील फरार वाहनावर चकलांबा पोलिसांची कार्यवाई

 

गेवराई, दि. 10 (वार्ताहार) – चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील उमापूर फाटा येथे भारत पेट्रोल पंपासमोर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून राक्षसभुवनकडून येणारा विनानंबर प्लेटचा हायवा टिपर चकलांबा पोलिसांनी पकडला. सदरचा टिपर हा राक्षसभूवन वाळू घोटाळ्यातील फरार हे वाहन असल्याची माहिती आहे

हायवामध्ये अंदाजे 5 ब्रास अवैध वाळू आढळून आली. वाहनाची अंदाजे किंमत ₹30,00,000/- व वाळूची किंमत ₹30,000/- अशी एकूण ₹30,30,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाईदरम्यान वाहनचालक अर्जुन माणिकराव मराठे (वय 41, रा. पांढरवाडी, ता. गेवराई), वाहक अरुण रघुनाथ कापसे (वय 29, रा. उमापूर, ता. गेवराई) व वाहनमालक राजेंद्र भगवान पवार (रा. काळेगाव, ता. जि. बीड) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 221, 3(5), खान व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम 1957 चे कलम 21, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 15(1) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 39, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई बीड पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोपान वंजारे, पो.अं. हनुमान इंगोले, अक्षय जाधव यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page