मा. आ. अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालण्याची मागणी

वाळूचा नंगानाच सुरू; एकाच पावतीवर अनेक खेपा
गेवराई, दि. 4 (वार्ताहर) गेल्या काही महिन्यांपासून गेवराई तालुका अवैध वाळू चोरी प्रकरणी चर्चेत आहे. तहसीलदार संदीप खोमणे यांच्याविरुद्धची कारवाई प्रलंबित असताना स्टॉक टेंडरच्या नावाखाली सावरगाव, राक्षसभुवन व सुरळेगाव या ठिकाणांहून दररोज स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरू असून रस्त्याची यामुळे प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. या हायवाच्या वाहतुकीमुळे अनेक नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. याला लगाम लावण्यासाठी मा. आ. अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालून हा नंगानाच थांबवावा अशी मागणी होऊ लागली आहे.
राक्षसभुवन घरकुल घोटाळा प्रलंबित असताना सावरगाव व सुरळेगाव या ठिकाणी स्टॉक टेंडरच्या नावाखाली राक्षसभुवन तसेच या इतर ठिकाणांहून एकाच पावतीवर प्रशासनाच्या पूर्व परवानगीने हा सगळा उपसा सुरू असल्याची माहिती आहे. दिवसभरात शेकडो हायवा या रस्त्यावर फिरत असून ओव्हरलोड वाहने भरून जात आहेत. यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक प्रवासी लोकांना जीव मुठीत धरून वागावे लागते. यामुळे या परिसरातून चालणारा अवैध वाळू उपसा मा. आ. अमरसिंह पंडित यांनी लक्ष घालून बंद करावा अशी मागणी आंदोलन लाईव्हच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केली आहे.



