Uncategorizedबीड

पेट्रोल-डिझेल टंचाईवर जिल्हाधिकारी यांनी घातले लक्ष

Spread the love

बीड शहरातील पंप चालक-मालकांची तातडीची बैठक; कंपन्यांना इंधनसाठा वाढवण्याचे आदेश

 

बीड, दि. 4 (वार्ताहार): जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज बीड शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांची तातडीची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत यावेळी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकीत शहरासह जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पेट्रोल पंप चालक-मालकांनी कंपनीमार्फत आवश्यक प्रमाणात इंधनाचा पुरवठा होत नसल्याने अनेक ठिकाणी इंधनटंचाई निर्माण झाली असून काही पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ येत असल्याची माहिती दिली.

या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बीड शहर तसेच जिल्ह्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात इंधनसाठा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

तसेच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक-मालकांनी उपलब्ध असलेल्या पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवावा, नागरिकांना विनाकारण गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी व इंधन वितरणामध्ये पारदर्शकता राखावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी नागरिकांना आवाहन जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button

You cannot copy content of this page