क्राईम

चोर गेला आणि डाकू आला अशी चकलांबा ठाण्याची अवस्था, पोलिस अधीक्षकांच्या विश्वासाला तडा

Spread the love

चोर गेला आणि डाकू आला अशी चकलांबा ठाण्याची अवस्था

पोलिस अधीक्षकांच्या विश्वासाला तडा

गेवराई दि 29 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाण्यात ठाणेदारासह अन्य लोकांविरूद्ध लाचलूच प्रतिबंधक विभागाची मोठी कार्यवाई झाल्यानंतर काही तासांतच कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी या ठिकाणचा पदभार सपोनि सचिन इंगळे यांच्या कडे सोपविला तसेच गत ठाणेदारामुळे बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली तशीच काही प्रचिती नुतन ठाणेदार यांच्या बाबतीत होऊ नये अवघ्या पंदराच दिवसांच्या कार्यकाळात वाटाघाटीचा फार्मुला ठरला आहे त्यामुळे चोर गेला आणि डाकू आला अशी अवस्था याठिकाणची झाली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस दलाचे प्रमुख नवनित कॉवत यांनी जिल्हाला कायदा व सुवैस्था शिकवली परंतू चकलांबा पोलिस ठाणे याला अपवाद ठरत आहे क्राईम मिंटिग मध्ये केलेले मार्गदर्शन केवळ डायरीवर गिरवून त्यांची अंमल बजावणी झालेली नाही तसेच चकलांबा ठाणे हे अवैध वाळूचे माहेरघर आहे राक्षसभूवन,गूळज,बोरगाव,या परिसरातून राजरोज पणे वाळूची चोरटी वाहतूक केली जाते तसेच या बेकायदेशीर वाळू उपस्याला पोलिस प्रशासनातूनच बळ आहे.गत पंदरा दिवसापुर्वी चकलांबा ठाणेदार संदिप पाटील यांच्यासह दोन कर्मचारी यांच्यावर लाचेची मागणी प्रकरणी मोठी कार्यवाई झाली परंतू काही दिवसांतच पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी विश्वास दाखवलेला ठाणेदार सचिन इंगळे यांनी अद्याप एकही धाडसी कार्यवाई केलेली नाही तसेच ठाण्याचा कारभार संभाळण्यासाठी व वाळूची मोहमाया गोळा करण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती असून वाटाघाटीचा फार्मुला ठरला असल्याच्या चर्चा अवैध धंद्यावाले यांच्यासह पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू आहे.वेळीच पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालावे नसता पुन्हा ऐकदा बीड पोलिसांची मान शरमेनं खाली जाऊ शकते यात मात्र दूमत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page