क्राईम

बीड एसीबीच्या कार्यवाईने पोलिस दलात खळबळ

Spread the love

रिक्षा सोडण्यासाठी हजाराची लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर गुन्हा

 

गेवराई दि 29 ( वार्ताहार ) जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायां वरून दिसून येत आहे.गेवराई येथे पकडलेली रिक्षा सोडण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोन पोलिसांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २९) ही कारवाई करण्यात आली.

सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन संताराम शिंदे (वय ४८, रा. शाहूनगर, बीड) आणि पोलीस हवालदार रामराव केशव आघाव (वय ४६, रा. शिक्षक कॉलनी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

रिक्षा सोडण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी दोन्ही पोलिसांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे पोलीस दलातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page