एसपींनी कानउघडनी करताच चकलांबा पोलिसांची एका हायवावर कार्यवाई
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्या पासून काही दिवसांतच या ठिकाणी असनारे ठाणेदार सचिन इंगळे यांचा कारभार वादाच्या भोवऱ्यात आहे तसेच पोलिस अधिक्षक यांनी दाखवलेल्या विश्वासाला चकलांबा ठाणेदार पात्र नाहीत तसेच कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी कानउघडनी करताच चकलांबा पोलिसांनी एक वाळूच्या अनाधिकृत हायवावर कार्यवाई केली असल्याने याठिकाणी अनाधिकृत वाळू तस्करी सुरू असल्याचे सिद्ध होते गत काही दिवसांपुर्वी चकलांबा ठाणेदार व दोन कर्मचारी यांच्या विरूद्ध एसीबीच्या कार्यवाई नंतर वादग्रस्त ठरलेल्या चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार सपोनि सचिन इंगळे यांच्याकडे सोपविला तसेच काही दिवसांतच त्यांनी वाळू माफियाशी व ईतर अवैध धंद्यावाल्याशी सुत जूळवले असल्याची माहिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणे हे वाळू माफियांचे केंद्र आहे याठिकाणी अनाधिकृत वाळू उपसा व विषय कळीचा ठरला आहे त्यातच एका वाळू तस्कराने या ठाण्याचे बिंग फोडले होते त्यानंतर बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी याठिकाणी सपोनि सचिन इंगळे यांचा गत रेकॉर्ड तपासून त्यानां सदर ठिकाणी नियूक्त केले परंतू काही दिवसांतच त्यांनी अवैध धंद्यावाल्याशी सुत जूळवले असल्याची चर्चा पोलिस दलात दबक्या आवाजात सुरू झाली तसेच नियुक्ती बाबदही चर्चा होऊ लागल्या सदर प्रकणात व ठाण्याच्या कारभारा विषयी शंका येताच बीड पोलिस दलाचे प्रमुख कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी सपोनि सचिन इंगळे यांची कानउघडनी केली असल्याने चकलांबा चे ठाणेदार यांना जाग आली व प्रत्यक्षात वाळूवर कार्यवाई करण्यास सुरूवात केली आहे सदर ठिकाणी राजपत्रीत व खमक्या अधिकाऱ्याची नियूक्तीची गरज आहे जेणेकरून या परिसरातील अवैध धंदे व गून्हेगारी याला लगाम लागेल अशी भावना या परिसरातून अनेकजन व्यक्त करत आहेत तसेच या कार्यवाईत चकलांबा पोलिसांनी एक वाळूने भरलेला हायवा ताब्यात घेत कार्यवाई केली असून 30 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.