
विजयसिंह पंडित यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस
विजयसिंह पंडित यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस
===============
वाढदिवसाच्या निमित्ताने शिवछत्र आणि कृष्णाई चाहत्यांनी गजबजली
===============
गेवराई दि.२१ (प्रतिनिधी) बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी बीड येथील शिवछत्र आणि गेवराई येथील कृष्णाई निवासस्थानी हितचिंतक, कार्यकर्ते, युवक मित्रांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला. गेवराई शहरातील शिवाजी चौकात तलवाडा येथील युवा कार्यकर्ते गणेश बांगर मित्रमंडळाने विजयसिंह पंडित यांचा भव्य दिव्य सत्कार केला. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयराजे आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणानी गेवराई नगरी दुमदुमली होती
विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा देण्यासाठी बीड येथील शिवछत्र निवासस्थानी चाहत्यांनी आज सकाळ पासूनच प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी विजयसिंह पंडित यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
बीड येथे शिवशारदा सुझुकी शोरुम, शिवशारदा अँटोलाईन, रामनगर नामलगाव, पेंडगाव चौक, पेंडगाव, पाळसिंगी, परविन जिनींग, प्रथमेश गँस एजन्सी यासह बीड ते गेवराई प्रवासात ठिकठिकाणी विजयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला.
गेवराई शहरातील शिवाजी चौकात गणेश बांगर आणि मित्रमंडळाने आयोजित केलेला सत्कार सोहळा नेत्रदीपक होता. वाजत गाजत विजयसिंह पंडित यांचे स्वागत करुन त्यांच्यावर जेसीबीद्वारे गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला तर क्रेनद्वारे मोठा हार विजयसिंह यांचा घालून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कृष्णाई येथे अभिष्टचिंतन सोहळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी विजयसिंह पंडित यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक उपक्रम
विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त बीड आणि गेवराई तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवशारदा सुझुकी शोरुम येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. संदिप मडके यांच्या वतीने सहारा अनाथालय येथे अन्नदान करण्यात आले तर शिवछत्र दुर्गा समिती गेवराईच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले. तलवाडा येथे सरपंच विष्णुपंत हात्ते, उपसरपंच अज्जुभाई सौदागर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर २०० विधवांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तळेवाडी येथे सुदाम पवार यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला बेंच वाटप करण्यात आले. शेख मोहसीन यांच्या वतीने समर्थ कोचिंग क्लास येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. चकलांबा येथे अशोक गुंजाळ यांच्या वतीने मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेचे अध्यक्ष विजय चांदणे,
प्रदेश युवक अध्यक्ष रवि कानडे,
रिक्षा युनियन बीड जिल्हा अध्यक्ष जय चांदणे यांच्यावतीने शनिमंदिर पेठ बीड येथे अन्न, फळे वाटप करण्यात आले. मौजे रानमाळख येथे जयभवानी कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण जनजागृती करुन दुस-या डोसचा टप्पा या निमित्ताने पुर्ण केला.
दरम्यानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विजयसिंह पंडित यांच्या चाहत्यानी आपल्या एकनिष्ठ आणि अलोट प्रेमाचा दाखला दिला. आज झालेली हितचिंतकांची गर्दी भविष्यातील सोनेरी क्षणांची चाहूल असल्याची चर्चा या निमित्ताने होत होती.