आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? कोण आहे ती अभिनेत्री ?
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? कोण आहे ती अभिनेत्री ?
मुबंई दि २३ ( वार्ताहार ) आमिर खानने नुकताच किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट घेतला. आता काय तर आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला असल्याचे कळतेय. होय, सध्या ही एकच चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने (Aamir Khan) नुकताच किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट घेतला. आता काय तर आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला असल्याचे कळतेय. होय, सध्या ही एकच चर्चा रंगली आहे.आमिरने 2005 साली निर्माती किरण रावसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी आमिर व किरणने घटस्फोटाची घोषणा केली होती. या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आता आमिरने त्याच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, ‘लालसिंग चड्ढा’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेच आमिर तिसºया लग्नाची घोषणा करणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’च्या रिलीजआधी आमिर कोणताही वाद ओढवून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. पण या चित्रपटाच्या रिलीजनंतर लगेच आमिर लग्न करू शकतो. आता आमिरची तिसरी पत्नी कोण असणार? तर आपल्या एका को-स्टारसोबत आमिर लग्न करणार असल्याचं मानलं जातंय. तिचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
किरण व आमिरचा घटस्फोट झाल्यानंतर आमिरची को-स्टार फातिमा सना शेखचं (Fatima Sana Shaikh) नाव ट्रेंडमध्ये आलं होतं. ब-याच दिवसांपासून आमिर आणि फातिमा सना शेख यांच्या नावाची चर्चा आहे. फातिमासाठीच आमिरने किरणला घटस्फोट दिला, अशीही चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबतचा अधिकृत खुलासा झालेला नाही. फातिमाने आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात काम केलं होतं. यानंतर आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटातही ती झळकली होती. आमिरने1987 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग पुन्हा आमिरनं किरण रावसोबत संसार सुरु केला होता.