क्राईम

एक चार चाकी तसेच तिन दोन चाकी वाहनांचा समावेश

Spread the love

आठ लाखांची देशी विदेशी दारू जप्त;गेवराई पोलिसांची कामगिरी

 

गेवराई दि 13 ( वार्ताहार ) गेवराई शहरातून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या वाहनातून देशी व विदेशी दारू स्वत:च्या अर्थीक फायद्यासाठी विक्री केली जात असे तसेच गोपनिय बातमी दाराच्या खबरी वरून गेवराई पोलिसांनी वेगवेळ्या चार ईसमाकडे देशी व विदेशी अशी आठ लक्ष रूपयांची दारू पकडली आहे व याबाबद चार वेगवेगळे गून्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,
1. आरोपी गणेश विठ्ठल सावंत रा गोंडी ता अंबड हा त्याच्याकडे असलेल्या स्विफ्ट डिझायर या वाहनातून विदेशी दारू ची वाहतूक करताना मिळून आला असून त्याचकडून एकूण 6,46,000 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.2.आरोपी संतोष शंकर जमदाडे रा सावता नगर गेवराई हा त्याच्याकडे असलेल्या दुचाकीवरून बिअर चे बॉटल ची वाहतूक करताना मिळून आला असून त्याकडून एकूण 83,000 रू उद्या मला जप्त करण्यात आला आहे. 3. नामदेव गंगाराम गवारे रा. देवपिंपरी तालुका गेवराई हा विदेशी दारू ची दुचाकी वरून वाहतूक करताना मिळून आला असून त्याचकडून एकूण 52,400 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.4.आरोपी योगेश हरिभाऊ पवार रा. सुतार गल्ली गेवराई हा देशी विदेशी दारू ची दुचाकी वरून वाहतूक करताना मिळून आला असून त्याचकडून एकूण 83,340 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करून 01 चारचाकी, तीन दुचाकी वाहने जप्त केले असून एकूण 14,740 रू चा देशी विदेशी मुद्देमाल असा एकूण 8,64,740 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, .अनिल कटके, उप विभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. पवार, सपोनि.लंके, सपोनि.जंजाळ, पोउपनि.खोत, प्रो.पोउपनि.नागरे, ग्रे.पोउपनि.पारधी, पोह/1327 राऊत, पोह/223 राठोड, पोह/1548 गव्हाणे, पोह/530 घोलप, पोह/370 सदवदे, पोना/22 बारगजे व 04 होमगार्ड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page