गेवराई दि 2 ( वार्ताहार ) गेल्या काही दिवसापासून लाच खोरीबाबद बीड पोलिस दल चर्चेत आहे तसेच ही लाच खोरी रोखण्यात बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या समोर हे अवहान उपस्थित झाले असून तसेच ठाणेदार यांच्यावर दाखलवलेला विश्वास याला मात्र तडा जाऊ लागला आहे चकलांबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन इंगळे यांना नियूक्तीमुळे ते काही दिवसांतच वादग्रस्त ठरले आहे गेवराई उपविभागात दोन आणि गेवराई पोलिस ठाण्यात तिन असे मिळून पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक असतांना कनिष्ठाची वर्णी लागली असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,गत महिना भरापासून बीड जिल्हा पोलिस दलात एकूण चार पोलिस कर्मचारी यांच्यावर एसीबीची कार्यवाई झाली त्यातच चकलांबा पोलिस ठाण्यात ठाणेदार यांच्यासह तिन जणाविरोधात कार्यवाई झाल्याने बीड पोलिस दलातील लाच खोरी उघड झाली आहे तसेच चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्या पासून ठाणेदार यांची एकही ठोस कार्यवाई दिसली नाही वाळू,मटका,गूटखा,पत्याचे क्लब,व अवैध दारू विक्री यासारखे अवैध मोठ्या प्रमाणात या हद्दीत सूरू असल्याचे दिसून येत आहे सदर ठिकाणी खमक्या अधिकारी देण्याची मागणी जोर धरू लागली असून चकलांबा पोलिस ठाणे हे अवैध वाळू तस्करीचे केंद्र आहे याला उदवस्त करण्यासाठी राजपत्रीत तसेच अनूभवी ठाणेदार या ठिकाणी देण्याची गरज आहे ही बाब कर्तव्य पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी लक्षात घ्यावी नसता पुन्हा ऐकदा या ठाण्याच्या वादग्रस्त कारभारामुळे बीड पोलिस दलाची मान शरमेनं खाली जाऊ शकते यात मात्र दूमत नाही.