गेवराई पोलीस स्टेशनने नष्ट केला; साडेतीन लाखांचा जप्त केलेला गुटखा

 

                 गेवराई : दि 4 ( वार्ताहार ) 
शहरातील पोलीस ठाणे मध्ये गु.र.नं 378/20 मधील तीन लाख 51 हजाराचा जप्त केलेला गुटखा न्यायाधीशांच्या आदेशाने अन्नसुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य बीड यांच्या उपस्थितीमध्ये नष्ट करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई पोलिस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाहतूक करणारा गुटख्याचा टेम्पो गेवराई पोलिसांनी पकडला होता याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गु.र.नं. 378/20 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाई मधील तीन लाख 51 हजारांचा जप्त केलेला गुटका न्यायाधीशांच्या आदेशाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य बीड यांच्या उपस्थितीमध्ये नगरपरिषद कचराकुंडी पांढरवाडी रोड या ठिकाणी एकत्र करून जाळून नष्ट करण्यात आला यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी महेन्द्र गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पेरगुलवार, पोलीस उपनिरीक्षक बोडखे पो.ना.बहिरवाळ, खटाने, माळी, साजेद सिद्धीकी, नवनाथ गोरे यांच्यासह पत्रकार सुशिल टकले, भागवत जाधव व आदी जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *