माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत गेवराईत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
१५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात
गेवराई दि 3 ( वार्ताहार )
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने गेवराई शहरातील शारदा विद्यामंदिर आणि न्यु हायस्कूल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई तालुक्यातील शारदा विद्यामंदिर, न्यु हायस्कुल आणि जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर येथे कोविड प्रतिबंधक लस १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. गेवराई तालुक्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.राजेंद्र आंधळे, प्राचार्य राजेंद्र जगदाळे, मुख्याध्यापक अंकुशराव तौर, प्राचार्य वसंत राठोड, माजी नगरसेवक शांतीलाल पिसाळ, गोरखनाथ शिंदे, दत्ता दाभाडे, शाम रुकर, अक्षय पवार, धम्मपाल भोले, संदीप मडके, महेश मोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या सिस्टर डोंगरे, निलिमा वळवी, शेख असेफ व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. उपस्थितांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करत असताना विजयसिंह पंडित यांनी कोविड संक्रमणापासून बचाव करण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम सर्वांनी पाळले पाहिजेत असे आवाहन करून गर्दीच्या ठिकाणी जावू नका, हात स्वच्छ धुवा, मास्क लावा यांसह सूचना देवून पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...