इंदिरा प्राथमिक विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
शाम अडागळे बीड दि 3 येथील मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मोरगाव द्वारा इंदिरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम एस एस तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव जे पी सर,सानप सर उपस्थित होते.
या बाबद सविस्तर माहिती अशी की , आज दि 3 जानेवारी रोजी शिक्षणा पासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेठवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती इंदिरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बीड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे जाधव जे पी सर व सानप सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण बी एल तर आभार पवार सर यांनी मानले यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शाळेचे मुख्यध्यपक कदम एस एस , विद्यार्थी,आमटे मॅडम, थोरात मॅडम आदी उपस्थित होते .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...