April 19, 2025

दवाखान्यावरचा विश्वास उडत चाललाय – माजी आमदार अमरसिंह पंडित

आधार रुग्णालयाने रुग्ण सेवेतून आदर्श उभा करावा – डॉ. सुरेश साबळे

                  गेवराई दि. 2 ( वार्ताहर )

 सरकारी योजना असल्याचे दाखवून, त्या आशेने आलेल्या रुग्णांना ऐनवेळेस दडपणात आणायचे आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा. हे धोरण ठेवून काम करणाऱ्या दवाखान्यावरचा विश्वास उडत चाललाय. हे कटू सत्य आहे. त्यामुळे, आधार रुग्णालयाने मिळालेल्या संधीचा सेवा धर्म म्हणून उपयोग करावा आणि मतदारसंघातील रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी येथे केले. दरम्यान,

गोरगरीब समाजातील रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान जन आरोग्य सुविधेचा लाभ, कोणत्याही रुग्णांना औषधोपचारा पासून ते सुट्टी घेऊन घरी जाईपर्यंत एक रुपया ही न देता पूर्ण पणे मोफत घेता येतो. ही योजना पूर्णतः कॅशलेस आहे. रुग्ण सेवा म्हणजे इश्वर सेवा आहे. ही चांगली संधी आधार रुग्णालयाला मिळाली असून, रुग्णांना उत्कृष्ट सेवा देऊन, बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी येथे केले.
गेवराई येथील आधार रुग्णालयात नव्याने उपलब्ध झालेल्या विविध योजनेचा उद्घाटन समारंभ 2 जानेवारी रोजी सायं 5 वाजता पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष पापा मोटे, चेअरमन मोहनराव जगताप, पोलीस निरीक्षक पेरगुलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महादेव चिंचोळे, डॉ. संजय जाधव, जेष्ठ नेते शेख जमादार, धर्म गुरू मुफ्ती साहब यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, सरकारी योजनेचा माध्यमातून दवाखान्यात सुविधा उपलब्ध अस्तात. मात्र, त्या वेळेवर उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. हल्ली दवाखान्यात नवाच पायंडा पाडला जात असून, योजना असून ही रुग्णांच्या नातेवाईकांना घाबरवून नगदी पैसे घेऊन तातडीने उपचार केले जात आहेत. त्यामुळे, सरकारी यंत्रणेने वेळीच लक्ष घातले पाहीजे, अशी अपेक्षा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे म्हणाले की, सध्याचा काळ कठीण असून, कोरोना संकट अद्याप ही गेलेले नाही. फार हालक्यात घेऊ नका. मास्क वापरा. आजाराची काळजी न घेता गाफील राहीलात तर त्याचे परिणाम आपल्याच लोकांच्या जीवावर येतील. खूप चांगली माणसे गमावण्याची दुर्दैवी वेळ अनेक कुटुंबावर आली होती. तो दुखद प्रसंग डोळ्यासमोर आला तरी अंगावर काटा उभा राहतो.म्हणून, विनंती करतो. डोस घेऊन, सरकारला सहकार्य करून, स्वतःच्या व आपल्या आजूबाजूच्या लोकांची जीव वाचवा. तिसरी येईल किंवा नाही येईल, परंतू आपण गाफील राहून चालता येणार असे ही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारी च्या मोफत आरोग्य योजनेसाठी पुढे आले पाहीजे. ही काळाची गरज असून, गोरगरीब समाजातील घटकांना पूर्ण मोफत असलेल्या या सर्व योजना मिळाल्याच पाहिजेत. गोरगरीब समाजातील रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले व पंतप्रधान जन आरोग्य सुविधेचा लाभ, कोणत्याही रुग्णांना औषधोपचारा पासून ते सुट्टी घेऊन घरी जाईपर्यंत एक रुपया ही न देता पूर्ण पणे मोफत घेता येतो. ही योजना पूर्णतः कॅशलेस आहे. रुग्ण सेवा म्हणजे इश्वर सेवा आहे. ही चांगली संधी आधार रुग्णालयाला मिळाली असून, रुग्णांना उत्कृष्ट सेवा द्यावी ,असे आवाहन ही शेवटी डॉ. साबळे यांनी केले.
संचलन पत्रकार सुशील टकले यांनी केले. आधार मल्टीस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. मोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पत्रकार, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *