राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जिनोम सिक्वेन्सींग मधून हा प्रकार समोर आल्याची पुष्ठी त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याची स्वत: अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या संदर्भाने देखील वृत्त समोर आले आहे. पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. सध्या त्यांना मुंबईच्या घरातच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आपली प्रकृती उत्तम असून लोकांनी काळजी करु नये केवळ संपर्कात आलेल्यांनी काही लक्षणे जानवल्यास तपासण्या करुन घ्याव्यात असे आवाहन पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...
मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क...