नव वर्षाची आरोग्यमय भेट;आधार रुग्णालयात मिळणार रुग्णांना सरकारी योजनेचा लाभ
मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी होणार उद्घाटन
गेवराई दि. 31 ( वार्ताहर )
येथील आधार मल्टीस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर सेंटर मध्ये गोरगरीब समाजातील रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य, ( MJPJAY ) पंतप्रधान जन आरोग्य ( PMJAY ) व कॅशलेस इन्शुरन्स योजनांचा लाभ मिळणार असून, रविवार ता. 2 रोजी सायं 5 वाजता बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे , आमदार लक्ष्मण पवार, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रा. सुनिल धांडे, पोलीस अधीक्षक ए.राजा रामास्वामी, छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ,या योजनेचा उद्घाटन समारंभ होणार असून, मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बी.आर. मोटे यांनी केले आहे.
गेवराई येथील सुसज्ज अशा आधार रुग्णालयात नव्याने उपलब्ध झालेल्या विविध योजनेचा उद्घाटन समारंभ 2 जानेवारी रोजी सायं 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या योजनेतून उपचार करण्यात येणार आहे. योजनेत समाविष्ट होण्यासाठी व लाभासाठी केवळ राशन कार्ड, आधार कार्ड ची गरज लागणार आहे. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना 24 तास सुविधा देऊन, आवश्यक त्या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. आधार रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी 50 अद्ययावत बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना 24 तास सुविधा देऊन, आवश्यक त्या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हाडाचे फ्रैक्चरचे ऑपरेशन ,मुतखडा, मणक्याचे आजार मणक्यातील गॅप किंवा गादी सरकल्याची शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया, शरिरावरील सर्व प्रकारच्या गाठींच्या शस्त्रक्रिया, दम्याशी संबंधीत व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचा उपचार, गुडप्याच्या शस्त्रक्रिया ,लिव्हरचे आजार, दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाशी संबंधित आजारावर उपचारा साठी ही योजना उपयोगात येणार असून, नॉर्मल डिलेव्हरी व सिझेरीयन सर्जरी मोफत करण्यात येणार आहे. कोणताही छुपा खर्च लागणार नाही. हृदयरोगावर, मुत्ररोग उपचार , कॅन्सरचे उपचार , सर्पदंश उपचार मिळणार आहेत. उपचारादरम्यान, नामांकित डॉक्टरची टीम उपलब्ध राहणार आहे. विविध आजारावर उपचार करण्यासाठी अतिदक्षता, सर्जरी, अस्थिरोग, स्त्रीरोग, मणके विकार, मेंदू विकार, मुत्ररोग, आर.एम. ओ. विभागातले नामांकित डॉक्टरांची टीम ही उपलब्ध असणार आहे. अशी माहीती येथील आधार मल्टीस्पेशालिटी ॲण्ड क्रिटीकल केअर सेंटरचे संचालक डॉ. मोटे यांनी दिली आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...