January 22, 2025

मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्या प्रकरणातील दोषीवर बडतर्फ ची कारवाई करा – डी पी आ

                      गेवराई दि 30 ( वार्ताहार )
गेवराई तालुक्यातील मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एक महिला प्रस्तुती साठी आल्या होत्या तपासणी न करताच कर्तव्यात कसूर करत बीड ला जाण्याचा सल्ला दिला व आरोग्य केंद्रात दाखल करण्यास नकार दिल्यामुळे शेवटी महिलेची प्रस्तुती आरोग्य केंद्राच्या दारात झाली तरी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे या प्रकरणात जे कर्मचारी, डॉकटर दोषी असतील यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यासाठी आज डीपीआय वतीने निर्दशने करण्यात आली .

या बाबद सविस्तर माहिती अशी की, सुरेखा कृष्णा माळी या मादळमोही आरोग्य केंद्रात प्रस्तुती साठी आल्या होत्या परंतु तिथल्या कर्मचाऱ्यांनी व डॉक्टर यांनी महिलेची तपासणी न करताच बीड ला जा असे म्हणाले व त्या महिलेची प्रस्तुती दारात झाली तरी सुद्धा तेथील कर्मचाऱ्यांनी ,डॉक्टरानी बघ्याची भूमिका घेतली व महिलेचा अवमान केला या सर्व प्रकरणाची माहिती डीपीआय तालुका उपाध्यक्ष सचिन धुरंधरे याना मिळाली व त्या महिलेची भेट घेऊन महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल व आज या प्रकरणातील जे कोणी दोषी असतील डॉक्टर, कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी डीपीआय च्या वतीने मादळमोही आरोग्य केंद्राच्या बाहेर निर्दशने करण्यात आली यावेळी डीपीआय बीड जिल्ह्याअध्यक्ष सुभाष लोणके, बीड जिल्हा युवक अध्यक्ष सुनील पाटोळे,जि. उपाध्यक्ष मदन हातागळे, विधी सल्लागार सोमेश्वर कारके, युवक तालुका अध्यक्ष साई अडागळे,बीड तालुका अध्यक्ष नितीन क्षीरसागर, संचार उमाप, युवा नेते पवन धुताडमल,आकाश धुताडमल, पत्रकार शाम अडागळे,राहुल गायकवाड, बाळू जगताप, रवी दुधाळ, मथिन शेख ,शिवराज जाधव ,बाळासाहेब मेंडके, आसाराम पुरी, व गावंकरी आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *